इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : वैमनस्यातून टोळक्याने दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये दोन तरूण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना कात्रज परिसरातील आंबेगाव येथे घडली आहे. ओंकार सुनील ढेबे, अनुज शिवराज लोखंडे, अमन जाफर शेख, रामेश्वर जाधव, आदित्य जालिंदर शिंदे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तर यश खंडू कांबळे (वय 23, रा. ग्रीन हिल पार्क सोसायटी, जैन मंदिराजवळ, कात्रज), सार्थक उर्फ ओम नितीन पंडीत (रा. अटल चाळ, कात्रज) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी याबाबत यश कांबळे याने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यश कांबळे आणि सार्थक पंडित हे दोघे मित्र आहेत. शनिवारी (5 एप्रिल) रात्री अकरा वाजेच्या सुमारास दोघे दुचाकीवरून कात्रजकडे निघाले होते. तेंव्हा आंबेगाव बुद्रुक परिसरात दुचाकीस्वार यश आणि सार्थक यांना आरोपींनी अडविले. तेथे अडवून त्यांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. तसेच तीक्ष्ण शस्त्राने वार केले. त्यानंतर जखमी झालेल्या दोघांना पोलिसांनी रुग्णालायत दाखल केले. सहायक पोलीस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे तपास करत आहेत.