Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजआंबेगाव, जुन्नर व शिरूर तालुक्यातील पिके पाणी अभावी धोक्यात - दिलीप वळसे...

आंबेगाव, जुन्नर व शिरूर तालुक्यातील पिके पाणी अभावी धोक्यात – दिलीप वळसे पाटील

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मंचर : आंबेगाव जुन्नर वशिरूर तालुक्यात दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. गुरांसाठी शेतातअसलेला चारा सुकू लागला आहे. शेतकऱ्यांकडून शेती व पिण्याच्या पाण्यासाठी मागणी वाढली आहे.

चाऱ्याचा व पाण्याचा गंभीर प्रश्न दूर होण्यासाठी कुकडी प्रकल्पातील घोड शाखा कालवा व मीना शाखा कालव्याचे उन्हाळी हंगाम पाणी आवर्तन तातडणे सोडावे “अशी मागणी राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

घोड शाखा कालवा व मीना शाखा कालव्याचे पाण्याचे आवर्तन ता. एक मार्च अखेर संपले आहे. सद्यस्थितीत एक महिना होऊन गेला. पण अद्याप पाणी नाही. दुभत्या गुरांचे चाऱ्याभावी काय होणार या विवंचनेत शेतकरी आहेत.

तसेच अनेक गावात पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न दिवसेंदिवस भेडसावत आहे. या भागातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक दादाभाऊ पोखरकर यांच्या नेतृत्वाखाली पाणी आवर्तन सोडण्याबाबत दिलीप वळसे पाटील यांची नुकतीच भेट घेतली होती.

या पार्श्वभूमीवर वळसे पाटील यांनी घोड शाखा कालवा व मीना शाखा कालव्याला पाणी सोडण्याबाबत पवार यांच्याकडे पत्र व्यवहार केला आहे. दरम्यान कालव्यातून सोडल्या जाणाऱ्या पाण्याचा उपयोग आंबेगाव जुन्नर शिरूर तालुक्यातील ४० गावे व तीस वाड्या वस्त्या वरील शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे करपू लागलेली पिके वाचू शकतील असे पोखरकर यांनी सांगितले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments