Sunday, December 10, 2023
Home क्राईम न्यूज "असे चित्रपट मी कधीच पाहणार.."; RRR, 'पुष्पा'बद्दल नसीरुद्दीन शाह यांचं मोठं वक्तव्य

“असे चित्रपट मी कधीच पाहणार..”; RRR, ‘पुष्पा’बद्दल नसीरुद्दीन शाह यांचं मोठं वक्तव्य

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मुंबई | 27 सप्टेंबर 2023 : नसीरुद्दीन शाह यांचं हिंदी सिनेसृष्टीत मोठं योगदान आहे. ते त्यांच्या दमदार अभिनयासोबतच बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले की, बॉलिवूड चित्रपटांमध्ये अभिनेत्यांना गौरविलं जातं. त्याचसोबत त्यांनी RRR आणि ‘पुष्पा’ यांसारख्या सुपरहिट दाक्षिणात्य चित्रपटांवरही टीका केली. असे चित्रपट पाहण्यासाठी मला कठीण वाटतात, असं नसीरुद्दीन शाह म्हणाले. एका युट्यूब चॅनलला त्यांनी ही मुलाखत दिली. यामध्ये ते बॉलिवूड आणि कलाकारांविषयी मोकळेपणे व्यक्त झाले.

शाहिद कपूरच्या कबीर सिंग या चित्रपटाच्या यशावर बोलताना ते म्हणाले, ‘पुरुषांमध्ये हल्ली असुरक्षिततेची भावना वाढत चालली आहे. म्हणून अति-पुरुषत्वावर अधिक भर दिला जातोय. मात्र त्याचसोबत ‘अ वेडनस्डे सारखे चित्रपटसुद्धा यशस्वी ठरत आहेत. ज्यामध्ये अतिपुरुषवादी नायक नसतो. अनुराग कश्यपच्या रामप्रसाद की तेरहवीं, ‘गुलमोहर’ यांसारख्या संवेदनशील चित्रपटांनाही त्यांची जागा मिळेल, अशी मला आशा आहे.”

RRR आणि पुष्पासारख्या चित्रपटांबद्दल ते पुढे म्हणाले, “आपली तरुण पिढी ही अधिक विकसित, अधित माहितीपूर्ण आणि समजदार आहे. मला आपल्या तरुण पिढीवर पूर्ण विश्वास आहे. मात्र RRR आणि पुष्पासारखे चित्रपट पाहून रोमांचशिवाय आणखी काय मिळतं असा प्रश्न मला पडतो. मी RRR पाहण्याचा प्रयत्न केला, मात्र मी पाहू शकलो नाही. मी अल्लू अर्जुनचा पुष्पा हा चित्रपटदेखील पाहण्याचा प्रयत्न केला, मात्र तोसुद्धा मी पाहू शकलो नाही. पण मी मणिरत्नम दिग्दर्शित एक चित्रपट पूर्ण पाहू शकलो. कारण ते फार सक्षम दिग्दर्शक आहेत. पण RRR आणि पुष्पासारखे चित्रपट पाहण्यासाठी मी कधीच जाणार नाही.”

नसीरुद्दीन शाह यांनी याआधी ‘गदर 2’, ‘द काश्मीर फाइल्स’ यांसारख्या चित्रपटांवरही टीका केली होती. “द केरळ स्टोरी आणि गदर 2 यांसारखे चित्रपट मी पाहिले नाहीत पण मला माहीत आहे की ते कशाबद्दल आहेत. द काश्मीर फाइल्ससारखा चित्रपट इतका लोकप्रिय होत असल्याचं पाहून खूप त्रास होतो. दुसरीकडे सुधीर मिश्रा, अनुभव सिन्हा आणि हंसल मेहता हे जेव्हा चित्रपटांमधून सत्य मांडण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांना लोकप्रियता मिळत नाही”, असं ते म्हणाले होते.

RELATED ARTICLES

प्रवासात गहाळ झालेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने परत; पोलिसांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) नालासोपारा: मुंबईतून वसईत ओला कॅबने प्रवास करत असताना गहाळ झालेले ८० हजारांची रोख रक्कम व ५ लाख रुपये किंमतीचे...

देहू-आळंदी रस्त्यावर ट्रकच्या धडकेने महिलेचा जागीच मृत्यू, अपघातानंतर चालक पसार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) चिखली (पुणे) : देहू-आळंदी रस्त्यावरील मुख्य चौक म्हणून ओळख असलेल्या तळवडे चौकात दुपारी एका गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकने...

ई-चालान भरा; नाहीतर लोकअदालतमध्ये हजर व्हा! १७ लाख वाहनचालकांना नोटीस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबईत दिवसेंदिवस वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या एकूण १७ लाख १०...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

प्रवासात गहाळ झालेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने परत; पोलिसांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) नालासोपारा: मुंबईतून वसईत ओला कॅबने प्रवास करत असताना गहाळ झालेले ८० हजारांची रोख रक्कम व ५ लाख रुपये किंमतीचे...

देहू-आळंदी रस्त्यावर ट्रकच्या धडकेने महिलेचा जागीच मृत्यू, अपघातानंतर चालक पसार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) चिखली (पुणे) : देहू-आळंदी रस्त्यावरील मुख्य चौक म्हणून ओळख असलेल्या तळवडे चौकात दुपारी एका गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकने...

ई-चालान भरा; नाहीतर लोकअदालतमध्ये हजर व्हा! १७ लाख वाहनचालकांना नोटीस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबईत दिवसेंदिवस वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या एकूण १७ लाख १०...

स्पार्कल कँडल’ कारखाना स्फोट प्रकरणी २ महिलांसह चौघांवर गुन्हा; एकाला अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : 'स्पार्कल कँडल' बनविणाऱ्या कारखान्यात स्फोट झाल्याप्रकरणी जागा मालक, कारखाना चालक तसेच दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला....

Recent Comments