Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजअश्लील शेरेबाजी करत पकडला महिलेचा हात, तिघांवर गुन्हाः पुण्यातील धक्कादायक प्रकार

अश्लील शेरेबाजी करत पकडला महिलेचा हात, तिघांवर गुन्हाः पुण्यातील धक्कादायक प्रकार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्यातील बिबवेवाडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन रोडरोमीयोंनी कामावरून घरी जाणाऱ्या महिलेचा पाठलाग करून अश्लील शेरेबाजी करत तिचं हात पाकडला. तसेच स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन विनयभंग केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार बिबवेवाडी भागातील जगताप डेअरी जवळ घडला आहे. याप्रकरणी तीन जणांवर बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत ३१ वर्षीय महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून सागर किसन धुमाळ, योगेश ढेबे, हरि राठोड (तिघे रा. अंबिकानगर, अप्पर बिबवेवाडी, पुणे) यांच्यावर आयपीसी 354, 509, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

बिबवेवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला खासगी ठिकाणी कामाला आहेत. कामावरुन पायी घरी जात असताना डगताप डेअरीजवळ सागर धुमाळ याने तक्रारदार यांचा हात पकडला. तसेच तु मला खुप आवडते असे म्हणून अश्लील वर्तन केले. तर इतर आरोपींनी शेरेबाजी करत अश्लील हातवारे केले. तर हरी राठोड याने बघून घेण्याची धमकी देऊन असभ्य वर्तन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments