Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजअवैध दारूसह २.८२ कोटींचा मुद्देमाल जप्त

अवैध दारूसह २.८२ कोटींचा मुद्देमाल जप्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुणे जिल्ह्यातून गेल्या दोन महिन्यांत अवैध दारूसह दोन कोटी ८१ लाख ९१ हजार ३४९ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत विविध प्रकरणांत मिळून एकूण ४२६ गुन्हे दाखल केले असून, यामध्ये ४११ संशयितांना अटक केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुणे जिल्ह्यातील अवैध दारू निर्मिती, वाहतूक व विक्रीवर आळा घालण्यासाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. यासाठी भरारी पथकांची स्थापना करण्यात आली असून, या पथकांनी एक जानेवारी २०२४ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत विविध ठिकाणी छापे टाकत ही कारवाई केली आहे.

या कारवाईत २० हजार ६७५ लिटर हातभट्टीची दारू, ७६१ लिटर देशी मद्य, १८ हजार २९५ लिटर विदेशी मद्य, १३८ लिटर बिअर व १ हजार ८२३ लिटर ताडीसह ३६ वाहने जप्त करण्यात आली आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईसाठी एकूण १४ नियमित व तीन विशेष पथके तयार केली आहेत. अवैध दारूची तपासणी करण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी तपासणी नाके उभारण्यात येणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments