Tuesday, January 14, 2025
Homeक्राईम न्यूजअवैधपणे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक; जूनी सांघवीतील घटना !

अवैधपणे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक; जूनी सांघवीतील घटना !

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पिंपरीः अवैधपणे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही कारवाई सांगवी आणि बावधन येथे करण्यात आली आहे.

रोहित दुर्गेश धर्माधिकारी (वय २३, रा. प्रियदर्शनीनगर, जुनी सांगवी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस अंमलदार प्रवीण पाटील यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुनी सांगवी येथील गणपती विसर्जन घाटावर रोहित पिस्तूल घेऊन आला असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून रोहितला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून ५० हजार रुपयांचे पिस्तूल व दोन हजार रुपयांचे एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.

तर दुसऱ्या कारवाईत केशव त्रिंबक काळे (वय २४, रा. हिवरे, भोजेवाडीता, जि. बीड) याला अटक करण्यात आली आहे. पोलीस नाईक तौसिफ महात यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी केशवला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ५० हजार रुपयांचे पिस्तूल, एक जिवंत काडतूस, पाच लाख रुपयांची एक मोटार, ९० हजारांची रोकड असा सहा लाख ४५ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments