इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
उन्हाळ्याच्या तीव्र झळासुरू असताना आता भारतीय हवामान विभागाने देशातील अनेक राज्यांसह महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. मागील काही दिवसांपासून उष्णतेचा पारा तुलनेने घसरला आहे. आज वादळी वाऱ्यासह मुसळधारा पासून पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
हवामान विभागानुसार, आज राज्यातील नागपूर, चंद्रपुर, अमरावती, वर्धा, भंडारा, नांदेड, लातूर धाराशिव सोलापुर, गोंदियासह, गडचिरोली या जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे.
दुपारी नांदेडमध्ये हलका पाऊस…
याबरोबरच, पुढील दोन दिवस राज्यात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने 13 एप्रील 11 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. उद्या विदर्भ, कोल्हापुरापर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याने अवकाळी पावसाचा इशारा दिला होता.
त्यानंतर आज (13 एप्रिल) सकाळ पासून नांदेडमध्ये ढगाळ वातावरण होते. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पावसाचे आगमन झाले. पडलेल्या पावसामुळे नागरिकांचा ऊन्हापासून बचाव झाला. मात्र, अवकाळी पावसाने शेतीला चांगला फटका बसला असून फळबागेचे नुकसान होण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत आहे.