Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजअवकाळी पाऊस, वादळी वाऱ्याचा फटका: पुण्यात 21 ठिकाणी घडल्या झाडपडीच्या घटना,...

अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्याचा फटका: पुण्यात 21 ठिकाणी घडल्या झाडपडीच्या घटना, वाहनांचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे शहरात अचानक आलेल्या अवकाळी पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे २१ वेगवेगळ्या भागांमध्ये झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. गुरूवारी (ता.९) दुपारी साडेतीन ते संध्याकाळी साडेसातच्या सुमारास अग्निशमन विभागाला २१ कॉल आहे. या झाडपडीच्या घटनांमध्ये अनेक चारचाकी वाहनांचे नुकसान झाले. तर काही ठिकाणी वाहतुक कोंडी झाली होती.

गुरूवारी दुपारी जिल्ह्यासह शहरात खडकवासला, धायरी, वारजे, शिवाजीनगर, कात्रज आणि कोरेगाव पार्क पार्क परिसरात अवकाळी पाऊस पडला. त्याचदरम्यान सोसाट्याचा वारा सुटल्याने अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या रस्त्यांवर, वाहनांवर पडल्या. यामुळे अग्निशामक विभागाची चांगलीच धावपळ झाली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.

याठिकाणी झाल्या झाडपडीच्या घटना..

सारंग सोसायटी – सहकारनगर, शेलार मळा – कात्रज, पद्मावती मंदीर – सातारा रोड, हेलिऑन शाळेजवळ – सिंहगड रोड, मॉडल कॉलनी शिवाजीनगर, महात्मा सोसायटी – कोथरूड, शारदा निकेतन मुलींचे वसतीगृह कर्वेनगर, डीपी रोड – कोथरूड (येथील ५ चारचाकी वाहनांवर झाड पडल्याने मोठे वाहनांचे मोठे नुकसान झाले), दांगट पाटील इंडस्ट्रीयल इस्टेट – शिवणे, विद्युत नगर सोसायटी – कोरेगाव पार्क, जैन मंदिर जवळ भवानी पेठ, हॉटेल वैशाली मागे – फर्ग्युसन रस्ता, सेवासदन शाळेजवळ एरंडवणा (येथे देखील चारचाकी वाहनावर झाड पडले), साईबाबा मंदिराजवळ – टिंगरे नगर, सुस रोड – पाषाण, नामदेव नगर- वडगाव शेरी, तेजस नगर – कोथरूड (येथे देखील वाहनांवर झाडपडीची घटना), राहुल नगर – कोथरूड, सेनापती बापट रस्ता, डहाणूकर कॉलनी – कोथरूड आणि नाना पेठ पोलिस चौकीसमोर झाडपडीच्या घटना घडल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments