Tuesday, January 14, 2025
Homeक्राईम न्यूजअल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला 20 वर्षाची शिक्षा; रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात...

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला 20 वर्षाची शिक्षा; रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात होता गुन्हा दाखल…!

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

योगेश शेंडगे / शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात 12 ऑक्टोबर 2020 रोजी पिडीत अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरुन बलात्कारासह पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी महेश श्रीहरी लटपटे (वय 24 वर्षे, मुळ रा. लाडेवडगाव, ता. केज, जि. बीड) याचेविरुध्द गुन्ह्याचे तपासी अधिकारी राहुल धस, उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड विभाग (तत्कालीन) यांनी सखोल तपास करुन विशेष न्यायालय, जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजीनगर, पुणे कोर्टात पुराव्यासह दोषारोपपत्र दाखल केले होते.

या प्रकरणाची सुनावणी सुरु असतांना आरोपीने जामीनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला असता कोर्टाने सदरचा अर्ज रद्द केल्याने आरोपीने जामीनासाठी सुप्रिम कोर्टात अर्ज दाखल केला असता उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांनी त्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करत वेळोवेळी सदर केसमध्ये पाठपुरावा केल्याने सदर आरोपीचा जामीन अर्ज रद्द झाला होता.

तसेचया प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान गुन्ह्यातील साक्षीदार यांना पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी साक्षीदार यांना वेळेत कोर्टात हजर ठेवुन पाठपुरावा केला होता. साक्षी पुराव्याचे आधारे एस. आर. नरवडे न्यायालय पुणे यांनी 17 डिसेंबर रोजी आरोपी महेश लटपटे याला 20 वर्षे सश्रम कारावासाची व पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

सदर केसमध्ये सरकारी वकील भारती कदम, केस अधिकारी महादेव वाघमोडे पोलीस निरीक्षक, कोर्ट पैरवी अंमलदार पो. हवा. आप्पासाहेब सुर्यवंशी, पुणे सेशन कोर्ट पैरवी अधिकारी विद्याधर निचीत, पोलीस उपनिरीक्षक, जिल्हा कोर्ट पैरवी अधिकारी संतोष घोळवे, पोलीस निरीक्षक यांनी काम पाहिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments