Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजअल्पवयीन मुलीला घरी बोलवून वारंवार बलात्कार; विमानगर परिसरातील घटना

अल्पवयीन मुलीला घरी बोलवून वारंवार बलात्कार; विमानगर परिसरातील घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : एका अल्पवयीन मुलीला घरी बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार 20 मार्च 2024 ते 30 मार्च 2024 या कालावधीत विमानगर परिसरातील आरोपीच्या घरात घडला.

याबाबत १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून सद्दाम छिद्दु खान (वय-22 रा. लोहगाव, पुणे) याच्या विरोधात पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

विमानतळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी एकाच परिसरात राहण्यास आहेत. ते एकमेकांच्या परिचयाचे आहेत. आरोपीने पीडितेच्या घरात कोणी नसताना तिला इशारा करुन घरी बोलावून घेतले. तसेच मुलगी घरी आल्यानंतर ती अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील तिच्या अज्ञानपणाचा गैरफायदा तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.

आरोपीने वारंवार तिला घरी बोलवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याने मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करुन अटक केली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक धामणे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments