Friday, June 14, 2024
Homeक्राईम न्यूजअल्पवयीन मुलीला घरात घुसून बलात्कार करण्याची धमकी; दोन महिलांसह तिघांना अटक

अल्पवयीन मुलीला घरात घुसून बलात्कार करण्याची धमकी; दोन महिलांसह तिघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : चतुः श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असलेल्या पंधरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला घरात घुसून तिघांनी शिवीगाळ केली. तसेच तुझ्यावर बलात्कार करेन अशी धमकी देऊन विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना १४ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी चतुः श्रृंगी पोलीस ठाण्यात दोन महिलांसह तिघांवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

याबाबत पिडीत 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने रविवारी (दि.१९) चतु; श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरेखा कोमरेकर, काजल अलकुंटे, प्रदीप बाबू अलकुंटे (तिघे रा. जनवाडी जनता वसाहत) यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पिडीत मुलगी घरात एकटी होती. त्यावेळी आरोपी फिर्यादी यांच्या घरात घुसले. त्यांनी मुलीला अश्लील शिवीगाळ केली. तर आरोपी प्रदीप याने घराच्या खिडकीतून हात घालून मुलीचा हात पकडला. तिच्यासोबत अश्लिल वर्तन करुन बलात्कार करण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुजाता शानमे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments