Tuesday, April 29, 2025
Homeक्राईम न्यूजअल्पवयीन गतीमंद मुलीवर 9 वर्षांपासून लैंगिक अत्याचार; आईने आपल्या पतीविरुद्ध दिली...

अल्पवयीन गतीमंद मुलीवर 9 वर्षांपासून लैंगिक अत्याचार; आईने आपल्या पतीविरुद्ध दिली तक्रार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : मांजरी येथे बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे बापानेच गतीमंद असलेल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या 9 वर्षांपासुन नराधम बाप तिच्यावर अत्याचार करत होता. याबाबत एका 43 वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी सध्या 19 वर्षाची आहे. गतीमंद असल्याने ती घरीच असते. फिर्यादी महिला तिची काळजी घेत असतात. मांजरी येथील घरात असताना 9 एप्रिल 2025 रोजी फिर्यादी घरात काम करत होत्या. त्यावेळी त्यांचा पती आंघोळ करुन आला आणि तसाच उघडा आपल्या गतीमंद मुलीसमोर उभा राहिला. घडलेल्या प्रकारामुळे मुलगी घाबरली.

2016 पासून तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरीक संबंध

हा घृणास्पद प्रकार पाहून फिर्यादी आपल्या पतीवर संतापल्या. त्यानंतर फिर्यादी महिलेने आपल्या मुलीला विश्वासात घेतले. तिच्याकडे विचारणा केली असता फिर्यादी महिलेला धक्काच बसला. मुलीची आई घरी नसताना तिचा पती व या मुलीचा बाप हा 2016 पासून तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवत असल्याचे तिने आपल्या आईला सांगितले. तेंव्हा मुलगी अल्पवयीन होती. त्यानंतर मुलीच्या आईने पोलिसांत धाव घेऊन आपल्या पतीविरुद्ध फिर्याद दिली आहे.

त्यानंतर पोलिसांनी मुलीच्या बापाविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक अनिल बिनवडे तपास करीत आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments