Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजअर्चना गायकवाड पुण्याच्या नव्या आरटीओ, लवकरच स्वीकारणार पदभार

अर्चना गायकवाड पुण्याच्या नव्या आरटीओ, लवकरच स्वीकारणार पदभार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्याच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी पदी अर्चना गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी (दि. १३) रात्री परिवहन आयुक्त कार्यालयाकडून याबाबतचे आदेश देण्यात आले. राज्य परिवहन विभागातील बदल्या, तसेच पदोन्नत्यांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. त्यानुसार मागील आठवड्यात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना पदोन्नती देऊन प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून नेमण्यात आले. यामध्ये पुणे येथे कार्यरत असलेले उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांची छत्रपती संभाजीनगर येथे प्रादेशिक परिवहन अधिकारी पदी नियुक्ती झाली. तेव्हापासून पुणे आरटीओचा पदभार प्रभारी अधिकारी यांच्याकडे सोपवण्यात आला होता. आता नव्याने नियुक्ती करण्यात आलेल्या पुण्याच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड लवकरच पदभार घेतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments