Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा; पुण्यात दिवाळीचा माहोल, मंदिरे विद्युत रोषणाईने झळाळली

अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा; पुण्यात दिवाळीचा माहोल, मंदिरे विद्युत रोषणाईने झळाळली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : अयोध्येत साकारण्यात आलेल्या भव्य श्री राम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोमवारी, २२ जानेवारीला होणार आहे. यानिमित्ताने संपूर्ण शहरात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. शहरातील मंदिरे विद्युत रोषणाईने झळाळली आहेत. संस्था, सामाजिक संघटना आनंदोत्सव साजरा करण्यासाठी जय्यत तयारीला लागल्या आहेत. शहरातील बाजाराला दिवाळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होणार असल्याने शहरात व उपनगरातील वातावरण राममय झाले आहे. बाजारपेठेत दिवाळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. बाजारात भगवे झेंडे, पताका, बॅनर्स विकत घेण्यासाठी रामभक्त गर्दी करत आहेत. पूजेचे साहित्य खरेदीसाठी महिलांची लगबग सुरू आहे. श्रीरामांचे चित्र असलेल्या झेंड्यांना सर्वाधिक मागणी आहे. हे झेंडे उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या किमती खूप वाढलेल्या आहेत. शहरातील मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. घरोघरीही विविध कार्यक्रम साजरे केले जात आहेत. प्रभू रामांच्या मूर्तीबरोबर आकर्षक सजावटीचे साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी बाजारात गर्दी केली जात आहे.

ठिकठिकाणी धार्मिक विधी पूजा, गीत रामायण कार्यक्रम यावेळी पार पडत आहेत. काही ठिकाणी मिरवणुकीत राम मंदिराची प्रतिकृती, भाविकांसाठी विविध स्पर्धा, त्याचबरोबर नृत्य, भजन, भावगीते आणि एक दिवस राम नामाचा जप, असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शहरातील रस्ते, मुख्य चौक झाले राममय

शहरातील मुख्य चौकात शुभेच्छापर फ्लेक्स लागले आहेत. सिंहगड रस्ता, हडपसर रस्ता, सातारा रस्त्यावर रामभक्तांनी ठिकठिकाणी भव्य मिरवणूक आरती, प्रसाद, लाडू वाटप असे विविध उपक्रम गणेश मंडळ, सामाजिक संस्था व मंदिरात २२ जानेवारीला घेतले आहेत. शहरासह उपनगरेही भगवी झाली असून, सर्वत्र राममय आनंद उत्सव साजरा केला जात आहे.

रामभक्तांकडून मूर्ती व राम पूजन साहित्यांची मागणी वाढली

• शहरात श्रीरामांचे चित्र असलेले झेंडे ४० ते १५० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. भगवी टोपी १५ रुपये, श्रीरामाचे चित्र असलेले बिल्ले १० ते ३० रुपये, भगवे गमजे २० रुपये, दुचाकीला लावण्याचे छोटे झेंडे २० ते ५० रुपये, आकाश कंदील ४०० ते ७०० रुपयांना उपलब्ध आहेत. प्रभू श्रीरामाची छबी असलेली फोटो फ्रेम ५० रुपयांपासून ते २ हजार रुपयांपर्यंत आहे. या साहित्यांची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे.

श्रीरामाची दीड, दोन फुटांच्या मूर्तीची किंमत अडीच हजार ते साडे तीन हजार रुपयांपर्यंत आहे. तर प्रभू श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान असा दरबार असलेल्या मूर्तीची किंमत १० ते २५ हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. तर प्रभू रामाची फायबरची मूर्ती २५ हजारापासून ते १ लाखांपर्यंत विक्री केली जात आहे.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments