Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजअम्युनेशन फॅक्टरीचा अधिकारी असल्याचे सांगून ऑनलाईन 43 लाखांचा गंडाः तर पॅन कार्ड...

अम्युनेशन फॅक्टरीचा अधिकारी असल्याचे सांगून ऑनलाईन 43 लाखांचा गंडाः तर पॅन कार्ड अपडेटच्या बहाण्याने दहा लाखांची फसवणूक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

कोंढवा परिसरात राहणारे अब्दुल कादर हातिम भाई कोठावाला (वय -51) यांना एका अज्ञात व्यक्तीने व्हाट्सअपवर संपर्क साधून त्यांचा विश्वास संपादन केला. अम्युनेशन फॅक्टरीचा अधिकारी असल्याचे सांगून कूलिंग टॉवर भागाचे खरेदी करायचे आहे असे सांगून 43 लाख दहा हजार रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात व्हाट्सअप ग्रुपचे धारक व वापरकर्ते, विविध मोबाईल क्रमांक धारक, वापरकर्ते आणि विविध बँक खातेदारक वापरकर्ते यांच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कोंढवा पोलीस पुढील तपास करत आहे.

शेअर ट्रेडिंग मध्ये 22 लाखांची फसवणूक

हडपसर परिसरात राहणाऱ्या मयूर अरविंद मकवाना (वय -36) यांच्याशी अज्ञात मोबाईल क्रमांक धारकांनी संपर्क करून त्यांचा विश्वास संपादन केला. शेअर्स ट्रेडिंग मध्ये पैसे गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवून तक्रारदार यांची एकूण 22 लाख 66 हजार रुपयांची शेअर्स ट्रेडिंग मध्ये गुंतवणुकीसाठी भरण्यास लावून, कोणताही परतावा न देता सदर आरोपींनी एकत्रित कट रचून संबंधित रकमेची आर्थिक फसवणूक केली आहे. याप्रकरणी तक्रारदार यांनी हडपसर पोलीस ठाण्यात हिना मेहता, वरद गांधी नावाचे व्यक्ती, अज्ञात मोबाईल क्रमांक धारक आणि व्हाट्सअप ग्रुपधारक यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. याबाबत पुढील तपास हडपसर पोलीस करत आहे.

टास्कच्या आमिषाने पंधरा लाखांचा गंडा

हडपसर भागात राहणाऱ्या मोहिता शिवारी (वय-32) यांना अनोळखी व्हाट्सअप खात्यावरून एका व्यक्तीने संपर्क साधला. वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून काम देतो असे सांगून टेलिग्रामद्वारे टास्क पूर्ण केल्यास कमी कालावधीत चांगले पैसे मिळतील असे भासविण्यात आले. त्यानुसार टेलिग्राम आयडी द्वारे विविध ग्रुपवर संपर्क करण्यास भाग पाडून, त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना विविध बँक खाते क्रमांकवर एकूण पंधरा लाख 50 हजार रुपये भरण्यास भाग पाडून सदर रकमेची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे.

पॅन कार्ड अपडेटच्या बहाण्याने दहा लाखांची फसवणूक

फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या रमेश बाबू राजा मनी (वय – 42 ) यांना अनोळखी व्यक्तीने व्हाट्सअप वर संपर्क केला. आयसीआयसीआय बँक मधून बोलत असल्याचे सांगून तुमचे पॅन कार्ड अपडेट करण्याकरता, बनावट आयसीआयसीआय बँक अॅप इंस्टॉल करण्यास त्यांना सांगण्यात आले. तक्रारदार यांच्या मोबाईलचा रिमोट अॅक्सिस घेऊन बँक खात्यासोबत जोडलेला ईमेल आयडी बदलून त्यास आरोपींनी त्यांचा ईमेल आयडी जोडून एकूण दहा लाख रुपये परस्पर ट्रान्सफर करून, स्वतःच्या बँक खात्यात संबंधित पैसे घेऊन तक्रारदार यांची आर्थिक फसवणूक केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments