Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजअमोल कोल्हे-शिवाजीराव आढळराव पाटील आमनेसामनेः किल्ले शिवनेरीवर कोल्हे पडले आढळरावांच्या...

अमोल कोल्हे-शिवाजीराव आढळराव पाटील आमनेसामनेः किल्ले शिवनेरीवर कोल्हे पडले आढळरावांच्या पाया

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे जिल्ह्यातील शिरुर लोकसभा मतदारसंघात यंदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोनगटात अटीतटीची लढत होत आहे. शरदचंद्र पवार गटाकडून तुतारी चिन्हावर अभिनेते खासदार डॉ. अमोल कोल्हे हे निवडणूक लढवत आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून घडयाळ चिन्हावर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

एकमेकांवर आरोप प्रत्यारेप करणारे सदर दोघे नेते शिवजयंतीच्या अनुषंगाने किल्ले शिवनेरी येथे गुरुवारी एकत्र आले. दोघे नेते एकमेकांच्या समोरासमोर आल्यावर अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव यांचे पाया पडून आशिर्वाद घेत चर्चा केली, यामुळे राजकीय चर्चा सुरू झाल्या.

डॉ. कोल्हे म्हणाले, वयस्कर व्यक्तीला वाकून नमस्कार करणे ही आपली संस्कृती आहे. आज शिवजयंती असून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी मी शिवनेरीवर आलो आहे. कोणत्याही मंदिरात जाण्यापूर्वी पहिले नतमस्तक मी शिवनेरीवर झालो. किल्लयाचे पहिल्या पायरीचे दर्शन घेतल्यावर मला संघर्षाची, स्वाभिमानाची प्रेरणा मिळते. दिल्लीच्या तख्तासमोर न झुकण्याची आणि स्वाभिमान गहाण ठेवायचा नाही ही प्रेरणा शिवनेरी किल्लयावर मिळते. सर्वसामान्य नागरिकांसाठी लढण्याची प्रेरणा द्या हेच मागणे आज मी मागितल आहे. सन २०१९ची निवडणुक मी शरदचंद्र पवार यांच्या आशिर्वादाने लढली व जिंकली. आताही तेच करत असल्याने माझ्या भूमिकेत कुठे बदल झालेला नाही. शिरुरसह राज्यातील इतर मतदारसंघात देखील मी लक्ष घालत आहे. शिवाजीराव आढळरव यांनी दिल्लीला कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एकही वारी केली नाही. आक्रोश मोर्चाची टिंगल केली, व्यैक्तिक टिका केली परंतु माझे मत धोरणात्मक टिका करा असे आहे.

नौटंकी मी करत नाही

किल्ले शिवनेरीवर मी अनेक वर्षापासून येत असून शिवनेरीच्या पहिल्या पायरीवर नतमस्तक होऊन मी माझ्या प्रचाराची सभेस सुरुवात करत आहे. यापुढील आयुष्य हे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, कांदाला, दुधाला बाजार भाव मिळण्यासाठी मी कटिबध्द असणार आहे. शेतकरी कुटुंबातील मी असून सर्वसामान्य शेतकऱ्यांचे वेदना मला माहिती आहे. नौटंकी करण्याची मला सवय नाही असे यावेळी आढळराव पाटील म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments