Wednesday, November 29, 2023
Home क्राईम न्यूज अमृता सिंगबद्दल प्रश्न ऐकताच बदलले सनी देओलच्या चेहऱ्यावरील हावभाव, व्हिडीओ चर्चेत

अमृता सिंगबद्दल प्रश्न ऐकताच बदलले सनी देओलच्या चेहऱ्यावरील हावभाव, व्हिडीओ चर्चेत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मुंबई | 8 सप्टेंबर 2023 : अभिनेता सनी देओलने ‘गदर 2’ या चित्रपटातून जबरदस्त कमबॅक केलं आहे. गेली बरेच वर्षे सनी देओलला इंडस्ट्रीत फारसं यश मिळत नव्हतं. मात्र ‘तारा सिंग’च्या “भूमिकेतून त्याने कमाल करून दाखवली. 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने गेल्या 25 दिवसांत दमदार कमाई केली. आता शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ‘गदर 2 च्या कमाईचा वेग मंदावला चित्रपटाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर सनीने विविध मुलाखती दिल्या आहेत. लवकरच तो रजत शर्मा यांच्या ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमात सनी देओलला त्याच्या करिअरविषयी आणि त्याचसोबत खासगी आयुष्याविषयी बरेच प्रश्न विचारण्यात आले..

सनी देओल भावूक

येत्या शनिवारी सनी देओलची ही मुलाखत प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एका प्रोमोमध्ये सनी देओल भावूक झाल्याचं पहायला मिळत आहे. स्टुडिओमध्ये प्रवेश करताच ज्याप्रकारे प्रेक्षक त्याचं टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करतात, ते पाहून सनी देओलचे डोळे पाणावतात. इंडस्ट्रीत गेली बरीच वर्षे निराशा हाती आल्यानंतर आता कुठे त्याला यश पहायला मिळतंय. त्यामुळे प्रेक्षकांकडून मिळणारं हे प्रेम पाहून तो भारावला. अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर 2’ने आतापर्यंत 510 कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला जमवला आहे.

अमृताबद्दलचा प्रश्न ऐकताच..

दुसऱ्या प्रोमोमध्ये सनी देओलला खासगी प्रश्न विचारला जातो. वडील आणि दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी एकेकाळी सनी देओलच्या स्वभावाविषयी केलेल्या वक्तव्याचा उल्लेख मुलाखतकर्ते करतात. ” धरमजी एकदा म्हणाले होते, की तुम्ही कुटुंबातील साधू आहात”, असं ते म्हणतात. हे ऐकताच सनी देओलला हसू येतं. त्यानंतर पुढे रजत शर्मा म्हणतात, “धरमजी यांनी एका मुलाखतीत ‘बादल यूँ गरजता है या गाण्याविषयी वक्तव्य केलं होतं. त्यांनी तुम्हाला अमृता सिंगला मिठी मारण्यास सांगितलं होतं, पण तुम्ही तसं करू शकला नाहीत ” अमृता सिंगचं नाव ऐकताच सनी देओलच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलतात. त्याचा चेहरा लाल होतो. पुढे तो नेमकं काय म्हणतो, हे ऐकण्यासाठी संपूर्ण मुलाखतीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

सनी देओल आणि अमृता सिंग हे एकेकाळी रिलेशनशिपमध्ये होते, अशी जोरदार चर्चा होती. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. सनीने पूजा देओलशी लग्न केलं. या दोघांना करण आणि राजवीर ही दोन मुलं आहेत. तर दुसरीकडे अमृताने अभिनेता सैफ अली खानशी लग्न केलं. अमृता आणि सैफला सारा आणि इब्राहिम ही दोन मुलं आहेत.

RELATED ARTICLES

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

आंबेगाव तालुक्यातील अवसरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) अवसरी आयेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या जवसरी खुर्द, अवसरी बुद्दक, गावडेवाडी या परिसरात पाऊस झाला. अवसरी खुर्द येथे साडेतीन...

Recent Comments