इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे २ दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. शनिवारी ते रायगड किल्ल्याला भेट देणार आहेत. त्यानंतर मुंबईत त्यांचे कार्यक्रम आहेत. रायगड किल्ल्यावरील कार्यक्रम आटोपल्यानंतर ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार सुनिल तटकरे यांच्या सुतारवाडी येथील निवासस्थानी भोजनाला जाणार आहेत.
त्यामुळे अमित शहा यांच्या या दौऱ्यात रायगड जिल्हयाच्या पालकमंत्रीपदाचा वाद देखील सुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत, शुक्रवारी संध्याकाळी उशीरा ८ वाजता त्यांचे पुणे येथे आगमन होईल. त्यानंतर शनिवारी सकाळी साडेदहा वाजता पाचाड येथे राजमाता जिजाऊंच्या समाधीचे दर्शन घेतील.