Tuesday, July 15, 2025
Homeक्राईम न्यूजअमानुष कृत्य ! वाघोलीतील बालकाश्रमात शिपायाने केला मुलांवर लैंगिक अत्याचार, नराधम पोलिसांच्या...

अमानुष कृत्य ! वाघोलीतील बालकाश्रमात शिपायाने केला मुलांवर लैंगिक अत्याचार, नराधम पोलिसांच्या ताब्यात

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः पुण्याजवळील वाघोली परिसरातील एका बालकाश्रमात दोन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आश्रमातीलच एका शिपाय मागील अनेक महिन्यांपासून हे घृणास्पद कृत्य करत असल्याचे उघड झाले असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या घटनेने पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

नराधम शिपायाचे नाव रमेश दगडू साठे (वय ५५ वर्षे) असे असून पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी हा बालकाश्रमातील १० आणि ११ वर्षांच्या दोन चिमुकल्यांवर अत्याचार करत होता. या अमानुष कृत्यादरम्यान, तो मुलांचे हातपाय बांधून आणि काहीवेळा त्यांच्या तोंडांत बोळा कोंबून अत्याचार करत असे. एवढेच नाही, तर कोणालाही याबाबत सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन त्याने मुलांना गप्प ठेवले होते.

ही गंभीर बाब सह्याद्री आदिवासी ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे संचित व्यवस्थापक पंदारे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ घोडेगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि फिर्याद दाखल केली. पोलिसांनी रमेश साठेविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा पुढील तपासासाठी लोणीकंद पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. लोणीकंद पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, पीडित मुलांचा जबाब नोंदवला जात आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments