इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची गाथा थेट आता सातासमुद्रपार पोहोचणार आहे. जपानची राजधानी टोकियो येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारला जाणार आहे.. “आम्ही पुणेकर “या संस्थेने या स्मारकासाठी पुढाकार घेतला असून येत्या 8 मार्च रोजी महिला दिनाच्या निमित्ताने या पुतळ्याचा अनावरण होणार आहे.
ज्येष्ठ शिल्पकार विवेक खटावकर यांनी हा पुतळा बनवला आहे. हा पुतळा जपानला पाठवण्याआधी शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने देशातील एकूण 12 राज्यांमध्ये या पुतळ्याची भव्य मिरवणुक काढण्यात आली.. शिवरायांच्या भव्य प्रतिकृतीवर पुष्पवर्षाव करत, मिरवणूक काढून शिवरायांना मानवंदना देण्यात आली. उपस्थित महिलांनी शेकडो दिव्यांनी शिवरायांची आरती करत, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत जल्लोषपूर्ण वातावरणात शिव पूजन सोहळा रंगला. त्याचबरोबर देशातल्या राज्यातून सुमारे ८ हजार किलोमीटरचा प्रवास केलेल्या शिव स्वराज्य यात्रेचा पुण्यात गणेश कला क्रीडा मंच येथे समारोप करण्यात आला.. साता समुद्रा पार असलेल्या टोकियेत उभारणाऱ्या या छत्रपती शिवरायांच्या भव्य दिव्य अशा अश्वारूढ पुतळ्याच्यां उभारणीसाठी पुणेकरांचे खास कनेक्शन दिसून येत आहे.
. टोकियो येथे उभारण्यात येणाऱ्या या स्मारकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा 8 फूट उंचीचा अश्वारूढ पुतळा स्थापण्यात येणार आहे. या पुतळ्याचे वजन 250 किलो इतके असणार आहे. आठ फुटी हे भव्य दिव्य स्मारक स्पेशल विमानाद्वारे जपान येथे पाठवण्यात येत आहे. महाराष्ट्राचा अभिमान आता जपानमध्ये उभारणार हे महाराष्ट्र वासियांसाठी अभिमानास्पद आहे..
छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 395 जयंती आहे. महाराष्ट्र सह देशभरात ही विविध ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते.. आता छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची गाथा जपान बरोबर आता अमेरिकेतही पोहोचली आहे.. गेल्या बारा वर्षांपासून छत्रपती फाउंडेशन न्यूयॉर्क शहरातील टाईम स्क्वेअर व भारतीय दूतावासात शिवजयंती साजरी केली जाते.. आता न्यूयॉर्क शहरात शिवछत्रपतींचा पुतळा उभारण्याची घोषणा देखील करण्यात आली आहे..