Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजअपहरण झालेल्या मेंढपाळाची अंबाजोगाई येथून सुटकाः पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनची...

अपहरण झालेल्या मेंढपाळाची अंबाजोगाई येथून सुटकाः पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनची कामगिरी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

आर्थिक व्यवहारातून चिंचवडमधून अपहरण झालेल्या मेंढपाळाची गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथून सुटका केली. हा प्रकार २८ फेब्रुवारी रोजी घडला. तुकाराम साधू शिंपले (वय ४०) असे सुटका केलेल्या मेंढपाळाचे नाव आहे. ज्ञानेश्वर उर्फ बाळासाहेब यादव रुपनर (वय २२, रा. काळ्याची वाडी, ता. धारूर, जि. बीड) याला अटक केली आहे. २८ फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता धनेश्वर मंदिर चिंचवडगाव येथून एका व्यक्तीचे अपहरण झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली असता तुकाराम शिंपले यांचे अपहरण झाले असून ते बेलपाने घेऊन येत असताना त्यांना जबरदस्तीने एका कारमध्ये बसवून नेण्यात आले होते. कारच्या नंबर प्लेटवर चिखल लावण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या प्रकरणाचा तपास सुरु केला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यामध्ये काहीजण आढळून आले. ही गाडी बीड जिल्ह्यात गेल्याचे समजल्याने गुन्हे शाखेचे एक पथक बीडकडे रवाना करण्यात आले. तुकाराम शिंपले हे चिंचवड येथे येण्यापूर्वी अंबाजोगाई येथे शेळ्या-मेंढ्या विक्रीसाठी मध्यस्थी करीत होते. त्यांनी मध्यस्थी केलेल्या व्यवहारातील पैसे खरेदीदाराने दिले नव्हते.

त्यामुळे शिंपले यांनी त्यांच्या पत्नीचे दागिने, शेती विकून काही लोकांचे पैसे दिले होते. त्यानंतर उपजीविका चालवण्यासाठी ते चिंचवड येथे आले होते. दरम्यान, ज्ञानेश्वर रुपनर हा व्यक्ती बीड येथून चिंचवड येथे आठ दिवसांपूर्वी आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी बीड येथे जाऊन वेशांतर करून सलग दोन दिवस रुपनर याच्यावर पाळत ठेवली. त्यात रूपनर याच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या. त्यामुळे त्याच्या घराची झडती घेतली. घरातील एक खोली कुलूप लावून बंद होती. ती उघडली असता तिथे तुकाराम शिंपले आढळून आले. पोलिसांनी शिंपले यांची सुटका करत ज्ञानेश्वर रुपनर याला अटक केली.

ज्ञानेश्वर याचा मामा रघुनाथ नरुटे याच्या शेळ्या-मेंढ्या विक्रीत शिंपलेयांनी मध्यस्थी केली होती. त्यातील १४ लाख रुपये खरेदीदराने दिले नव्हते. त्या रागातून रघुनाथ याने भाचा ज्ञानेश्वर आणि त्याचे मित्र संदीप विक्रम नकाते, हंसराज सोळंके, नितीन जाधव यांना सुपारी दिली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments