Monday, December 11, 2023
Home क्राईम न्यूज अपघातानंतर अशी होती गायत्री जोशीची अवस्था; कार क्रॅशनंतर फोटो समोर

अपघातानंतर अशी होती गायत्री जोशीची अवस्था; कार क्रॅशनंतर फोटो समोर

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मुंबई | 6 ऑक्टोबर 2023 : ‘स्वदेस’ या चित्रपटात अभिनेता शाहरुख खानसोबत मुख्य भूमिका साकारलेली अभिनेत्री गायत्री जोशी इटलीतील भीषण कार अपघातामुळे चर्चेत आली. इटलीतल्या सार्डिनिया याठिकाणी दोन-तीन सुपरकार्सनी एका कॅम्परवॅनला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ती कॅम्परवॅनच उलटली. या अपघातात मागे असलेल्या फरारी कारला आग लागली आणि त्यात वृद्ध स्विस दाम्पत्याचा मृत्यू झाला. आता या अपघाताच्या तीन दिवसांनंतर अशी माहिती समोर येत आहे की इटली पोलिसांकडून गायत्री जोशी आणि तिचा पती विकास ओबेरॉय यांची चौकशी होऊ शकते. कारण ज्या दोन-तीन गाड्यांची टक्कर झाली, त्यापैकी बॉर्गिनी या सुपरकारमध्ये गायत्री आणि विकास होते. नुकताच सोशल मीडियावर या अपघातानंतरचा एक फोटो व्हायरल होत आहे.

12 ऑक्टोबर रोजी झालेल्या या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. या अपघाताचे फोटो आणि व्हिडीओ पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इटली पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत. सुदैवाने या अपघातात गायत्री आणि तिच्या पतीला कोणतीच गंभीर दुखापत झाली नाही. मात्र जर गायत्रीचा पती विकास याप्रकरणी दोषी आढळल्यास त्याला सात वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.

सोशल मीडियावर अपघातानंतरचा एक फोटो समोर आला आहे. हा फोटो अपघाताच्याच दिवसाचा आहे. फोटोमध्ये रस्त्याच्या बाजूला क्रॅश झालेली निळी कार पहायला मिळतेय. तर रस्त्यावर काही लोक उभे आहेत. एक महिला तिथेच रस्त्यावर स्तब्ध बसलेली पहायला मिळतेय. ही महिला गायत्रीच असल्याचं म्हटलं जात आहे. अपघाताच्या वेळी गायत्रीचा पती विकास हा लँबोर्गिनी हुरेकन स्पायडर (Lamborghini Huracan Spyder ) ही अत्यंत महागडी कार चालवत होता. नवी दिल्लीत या कारची किंमत तब्बल चार कोटी रुपये इतकी आहे.

कोण आहे गायत्रीचा पती विकास ओबेरॉय ?

गायत्री जोशीचा पती विकास ओबेरॉय हे ओबेरॉय रियल्टी लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. ओबेरॉय रियल्टी लिमिटेडची स्थापना रणवीर ओबेरॉय यांनी तीन दशकांपूर्वी केली होती. प्रॉपर्टी व्यतिरिक्त विकास हे हाऊसिंग, कॉर्पोरेट, हॉस्पिटल आणि रिटेलमध्येही गुंतवणूक करतात. विकास ओबेरॉय हे मुंबईतील प्रसिद्ध वेस्टीन हॉटेलचे मालकसुद्धा आहेत.

RELATED ARTICLES

महाराष्ट्रानंतर आता या राज्यातही दोन उपमुख्यमंत्री, भाजपचा मोठा निर्णय

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) MP New CM : मध्य प्रदेशात भाजपने ऐतिहासिक विजया मिळवल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. आता यावरील...

‘या’ बँकेत भरती प्रक्रिया सुरू, ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख, लगेचच करा अर्ज

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई : पदवीधरांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे तुम्ही कोणत्याही विषयात पदवी घेतली असेल तरीही तुम्हाला थेट बँकेत नोकरी...

पिंपरी चिंचवड महापालिकेतील अधिकाऱ्यांवर आयुक्तांचा नाही अंकुश, प्रशासनाबाबत तक्रारी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : महापालिकेच्या कारभारावर आयुक्तांचा अंकुश नसल्याचा आरोप होत आहे. विविध विभागांचे प्रमुख तसेच अधिकारी काम करत नसल्याच्या तक्रारी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

महाराष्ट्रानंतर आता या राज्यातही दोन उपमुख्यमंत्री, भाजपचा मोठा निर्णय

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) MP New CM : मध्य प्रदेशात भाजपने ऐतिहासिक विजया मिळवल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. आता यावरील...

‘या’ बँकेत भरती प्रक्रिया सुरू, ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख, लगेचच करा अर्ज

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई : पदवीधरांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे तुम्ही कोणत्याही विषयात पदवी घेतली असेल तरीही तुम्हाला थेट बँकेत नोकरी...

पिंपरी चिंचवड महापालिकेतील अधिकाऱ्यांवर आयुक्तांचा नाही अंकुश, प्रशासनाबाबत तक्रारी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : महापालिकेच्या कारभारावर आयुक्तांचा अंकुश नसल्याचा आरोप होत आहे. विविध विभागांचे प्रमुख तसेच अधिकारी काम करत नसल्याच्या तक्रारी...

एक दिवसासाठी काम बदलले अन् जीव वाचला! आगीतून वाचलेल्या रेणुका ताथोड यांची ‘आपबीती’

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : "दररोज स्पार्कल कँडलला स्टिकर लावण्याचे काम करायचे. पण, शुक्रवारी स्पार्कल कँडलला टोपण लावायचे काम दिले. त्यामुळे आग...

Recent Comments