Saturday, June 7, 2025
Homeक्राईम न्यूजअनैसर्गिक संबंधांतून हत्या, २१ वर्षीय तरुणाला ठोकल्या बेड्या

अनैसर्गिक संबंधांतून हत्या, २१ वर्षीय तरुणाला ठोकल्या बेड्या

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः मंडई मेट्रो स्टेशन परिसरातील मोकळ्या जागेत आढळून आलेल्या ५० ते ५५ वर्षीय अज्ञात व्यक्तीच्या हत्येप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी २१ वर्षीय रमेश प्रकाश सत्रे या तरुणाला अटक करण्यात आली असून, त्याने दारूच्या नशेत झालेल्या वादानंतर खून केल्याची कबुली दिली आहे. हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाला होता. दरम्यान, पोलिस आरोपीच्या मागावर होते. अखेर पोलिसांना आरोपीला पकडण्यात यश आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी मंडई मेट्रो स्टेशनजवळील मोकळ्या जागेत एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. व्यक्तीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती. त्यामुळे हा खुनाचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता रमेश सत्रे या तरुणावर पोलिसांना संशय आला.

हत्या केल्यानंतर आरोपी पुण्याबाहेर पळून गेल्याने पोलिसांचे विशेष पथक त्याच्या मागावर होते. अथक प्रयत्नांनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, रमेशने खुनाची कबुली दिली.

पोलिसांनी सांगितले की, रमेश हा व्यसनी आहे. खून झालेला अज्ञात व्यक्तीलाही दारूचे व्यसन होते. घटनेच्या रात्री मध्यरात्रीच्या सुमारास मृत व्यक्तीने रमेशकडे दारू पाज असा हट्ट धरला होता. यावेळी रमेशने त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यातून दोघांमध्ये जोरदार वादविवाद झाला. रागाच्या भरात रमेशने जवळच असलेल्या चाकूने मृताच्या गळ्यावर वार करून त्याचा खून केला, खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम अद्याप सुरू असून, पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments