Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजअनैतिक संबंधातून मोटारीखाली चिरडून तरुणाचा खून; महिलेसह दोन जणांना अटक

अनैतिक संबंधातून मोटारीखाली चिरडून तरुणाचा खून; महिलेसह दोन जणांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

नारायणगाव – अनैतिक संबंधला अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून मोटार अंगावर घालून तरुणाचा खून केल्या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी महिलेसह दोन जणांना आज रात्री अटक केली आहे. ही घटना आज दुपारी येथील पुणे -नाशिक महामार्गालगत असलेल्या अयोध्या हॉटेल समोर घडली.

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहेत. आरोपीवर भादवी कलम 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक सनील धनवे यांनी दिली.

मोटार अंगावर घालून साबीर मोहंमद शफी ब्यापारी (वय-45, राहणार पणसुंबा पेठ, जुन्नर) याचा खून केल्या प्रकरणी मुख्य आरोपी अभिजित सोनवणे (वय-28, राहणार डीगोरे, ता. जुन्नर) व सह आरोपी महिला जेबा इरफान फकीर (वय-32, पणसुंबा पेठ, जुन्नर) यांना अटक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार करत आहेत.

या बाबत माहिती अशी मृत साबीर मोहंमद शफी ब्यापारी व जेबा इरफान फकीर हे दोघेही विवाहित असून जुन्नर येथे शेजारी राहण्यास आहेत. साबीर हा जेबा हिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. जेबा ही कांदळी वसाहतीत एका कंपनीत कामास होती. नोकरी निमित्त ती रोज जुन्नर ते कांदळी ये जा करत असे. अभिजित सोनवणे हा तालुक्यात शेतजमीन मोजणीचे काम करतो. प्रवासा दरम्यान जेबा व अभिजित यांची ओळख झाली.

या माध्यमातून त्यांच्यात प्रेम संबंध निर्माण झाले. ही माहिती साबीर मोहंमद शफी ब्यापारी याला होती. या वरून साबीर व अभिजित यांच्यात वाद निर्माण झाला होता. रमजान सणासाठी काल अभिजित हा जेबा हिच्या घरी आला होता. या वेळी तू येथे का आलास असा जाब साबीर याने अभिजित याला विचारला. या वरून पुन्हा त्यांच्यात वाद झाला होता. आज सकाळी जेबा ही कांदळी येथे जाण्यासाठी जुन्नर येथून बसने निघाली होती.

दरम्यान साबीर याने तिचा पाठलाग सुरु केला. या बाबतची माहिती जेबा हिने मोबाईल कॉल करून अभिजित याला दिली होती. आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास साबीर हा येथील पुणे नाशिक महामार्ग लगत असलेल्या आयोध्या हॉटेल येथे उभा होता. दरम्यान अभिजित याने साबीर याच्या अंगावर मोटार घालून त्याला चिरडले. या घटनेत साबीर याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचे तीव्र पडसात उमटले.

आज सायंकाळी मुस्लिम समजाचा मोठा जनमुदाय नारायणगाव येथील पोलीस पोलीस ठाण्यात जमा झाला होता. आरोपीला अटक करण्याची मागणी मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांनी केली. पोलिसांनी पिंपळवंडी येथून आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर महिलेला ताब्यात घेतले.

आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून संगनमताने हा गुन्हा केला असल्याचे प्राथमिक तपासा निष्पन्न झाल्याने पोलिसांनी अभिजित सोनवणे व सह आरोपी महिला जेबा इरफान फकीर या दोघांनाही अटक करून खूनचा गुन्हा दाखल केला आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments