इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
रांजणगाव गणपतीः शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे 19 वर्षीय मुलीवर झालेल्या सामूहिक अत्याचारतील आरोपींना रांजणगाव पोलीस पोलिसांनी दोन तासाच्या अटक केली. यामुळे पोलिसांचे कौतुक होत आहे. रविवारी (दि. २) सायंकाळी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख व शिरूर उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांनी घटनास्थळी भेट दिली.
नुकतेच शिरूर तालुक्यातील एका तरुणाला स्वारगेट येथील अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक केली आहे. या घटनेनंतर शिरूर तालुक्यातील गुनाट गाव व शिरूर तालुका सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. हे अत्याचार प्रकरण संपूर्ण राज्यत व जिल्ह्यात गाजत आहे. हे प्रकरण ताजे असतानाच कारेगाव येथे 01 मार्च रोजी एका 19 वर्षीय मुलीवर दोघांनी अत्याचार केला. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच रांजणगाव पोलिसांनी पीडितेने केलेल्या वर्णनावरून सीसीटीव्ही तपासत अवघ्या दोन तासात संशयित आरोपींना अटक केली आहे. त्यानंतर घटनास्थळाला पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी भेट दिली.
दरम्यान कारेगाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोन्ही आरोपींना 7 मार्चपर्यंत शिरूर प्रथमवर्ग न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली.