इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : शहरातील शनिवार पेठेतील मंदार लॉज परिसरातील सरस्वती अपार्टमेंटमध्ये चोरट्याने मंगळवारी (४ फेब्रुवारी) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास बंद खोलीचे कुलुप तोडून सुमारे सात लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सरस्वती अपार्टमेंट येथे राहणाऱ्या ५६ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादिवरून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार पेठेतील मंदार लॉज परिसरातील सरस्वती अपार्टमेंटमध्ये चोरट्याने मंगळवारी (४ फेब्रुवारी) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास बंद खोलीचे कुलुप तोडून सुमारे सात लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली. फिर्यातदार महिला नोकरीवर असून त्या शनिवार पेठेतील मंदार लॉजच्या पाठीमागील सरस्वती अपार्टमेंटमध्ये वास्तव्याला आहेत. अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून सहा लाख ९७ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि रोकड चोरली आहे.
येथीलच दुसऱ्याही एका खोलीचे कुलुप तोडण्याचा प्रयत्न चोरट्याने केला मात्र त्यात त्याला अपयश आले. दिलेल्या फिर्यादिवरून पोलिस अधिक तपास करत आहेत.