Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजअजित पवार यांनी पहिल्यांदाच घरातील विरोधकांवर व्यक्त केला रागः माझा कधीच...

अजित पवार यांनी पहिल्यांदाच घरातील विरोधकांवर व्यक्त केला रागः माझा कधीच प्रचार न करणारे नातेवाईक आता माझ्याविरुद्ध गरागरा फिरत आहेत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

यापूर्वी माझ्या निवडणुकीत कधी माझी भावंडे, नातेवाईक माझ्या प्रचारासाठी फिरले नाहीत. आता ते गरागरा फिरत आहेत. पण उद्या निवडणूक झाल्यावर तुमच्या कामासाठी माझ्याशिवाय कुणी फिरणार नाही, अशा शब्दांत अजित पवारांनी घरातील विरोधकांवर राग व्यक्त केला.

अजितदादांनी बंड पुकारल्यावर शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवारांनी त्यांच्यावर वारंवार टीका केली. पण अलीकडील काळात त्यांचे सख्खे बंधू श्रीनिवास, वहिनी शर्मिला, चुलत बंधू राजेंद्र, पुतण्या युगेंद्र, पुतणी सई, आत्या सरोज पाटील यांनीही हल्लाबोल केला. श्रीनिवास पवार यांनी तर अजित नालायक माणूस आहे, असेही वक्तव्य केले. यातील काही जण बारामती मतदारसंघात प्रचारही करत आहेत.

त्यावर पहिल्यांदाच अजित पवारांनी जाहीर वक्तव्य केले. बारामती तालुका, शहरातील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते म्हणाले की, जो काम करतो त्यालाच निवडून द्यायचे असते. आता पावसाळ्यासारख्या छत्र्या उगवल्या अाहेत. त्यानंतर परदेशात जातील. मी तोंड सांभाळून बोलतो. मी गप्पा बसलो म्हणून फार वळवळ करता का? तोंड उघडले तर यांना तोंड दाखवण्यास जागा राहणार नाही. लोकसभेला तुम्ही मदत केली तर मी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे विकासकामांसाठी पाठपुरावा करू शकतो. केंद्राचा निधी अणून बारामतीचा कायापालट करण्यासाठी आम्हाला खासदारकी हवी अाहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. यापूर्वी अर्ज भरल्यावर मतदानाच्या आधी एक सभा घेतली जात होती. पण त्यांना (सुप्रिया सुळे) अाता सर्वत्र फिरावे लागते, असा टोलाही त्यांनी लगावला. राज्याच्या अर्थमंत्र्याच्या तुलनेत केंद्र सरकारकडे विकास कामांसाठी खूप पैसा असतो. तो आणून बारामतीचा विकास करायचा आहे. म्हणून माझ्या विचारांचा खासदार निवडून द्या, असेही ते म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments