इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. जय यांच्या आत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर जोडीचे फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे सर्वांचं लक्ष वेधले गेले आहे.
मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पवार कुटुंबियात फूट पडली होती. बारामती लोकसभा निवडणुकीत जय पवार यांनी आत्या सुप्रिया सुळे यांचे विरोधात प्रचार देखील केला होता. त्यामुळे जय पवार अधिक चर्चेत आले होते. यानंतर आता पवार कुटुंबीयांच्या घरी मंगलकार्य होणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचे लग्न ठरलं असून त्यांचा साखरपुडा दहा एप्रिलला पुण्यात होणार आहे. सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे प्रवीण पाटील यांची मुलगी ऋतुजा पाटील हिच्यासोबत हा साखरपुडा पार पडणार आहे. जय पवार यांच्या आत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शेअर केलेले फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
या शेअर केलेल्या फोटोमध्ये शरद पवार त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार सुप्रिया सुळे तसेच अन्य कुटुंबीय दिसत आहेत. जय पवार आणि त्यांची संभाव्य पत्नी ऋतुजा देखील या फोटोमध्ये दिसत आहेत. ‘जय आणि ऋतुजा यांचं अभिनंदन.. खूप आनंद झाला, आनंदी राहा आणि सुखी राहा असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे.