Wednesday, November 29, 2023
Home क्राईम न्यूज अजित पवार यांच्यासमोर भाजपचे आव्हान, निवडणुकीत कोण मारणार बाजी

अजित पवार यांच्यासमोर भाजपचे आव्हान, निवडणुकीत कोण मारणार बाजी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे | 3 नोव्हेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडत भाजपसोबत जाण्याचा निर्णय जुलै महिन्यात घेतला. त्यानंतर अजित पवार भाजप शिवसेना युतीच्या सरकारमध्ये सहभागी झाले. अजित पवार स्वत उपमुख्यमंत्री झाले. त्यांच्यासह नऊ जण मंत्रिमंडळात सहभागी झाले. परंतु आता एका निवडणुकीत अजित पवार आणि भाजप समोरासमोर आली आहे. अजित पवार यांच्या गावातच त्यांना भाजपने आव्हान दिले आहे. अजित पवार यांच्या काटेवाडीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला भाजपने आव्हान दिले आहे. काटेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पाच नोव्हेंबर रोजी मतदार होणार आहे. या निवडणुकीत सरपंचाची निवड थेट जनतेमधून होणार असल्याने रंगत वाढली आहे.

अशी रंगणार लढत

राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची धामधुम सुरु आहे. अजित पवार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजप पुरस्कृत पॅनेलसह एका अपक्ष उमेदवार सरपंच पदासाठी समोरासमोर आहे. यामुळे अजित पवार यांच्या काटेवाडीतील सरपंच पदाची निवडणूक तिरंगी होणार आहे. राष्ट्रवादीकडून मंदाकिनी दादा भिसे, भाजप पुरस्कृत पॅनेलकडून ज्योती बापू भिसे, तर तर अपक्ष कमल बापू भिसे यांच्यात लढत होणार आहे. सरपंचपद अनुसूचित महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. ग्रामपंचायत सदस्याच्या एकूण १६ जागांसाठी ही निवडणूक लढवली जाणार आहे. राष्ट्रवादी सरकारमध्ये असली तरी गावपातळीवर भाजपचा राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध कायम राहिला आहे.

जळगाव जिल्ह्यात प्रचारास वेग

जळगाव जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार आज संपणार आहे. मतदान पाच नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला आहे. प्रचारफेऱ्यामध्ये महिलांसह ग्रामस्थांचा सहभाग असल्याचा पाहायला मिळत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल सहा नोव्हेंबर रोजी लागणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत उच्चशिक्षित

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तरुणांचा चांगला सहभाग दिसत आहे. यापूर्वी चौथी पास, सातवी पास असे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात दिसत होते. परंतु आता इंजिनिअर, डॉक्टर, पदवीधर उत्तीर्ण झालेले उमेदवार सरपंचपदाच्या निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. ग्रामपंचायत सरपंचपदासाठी 27 ते 45 वयापर्यंत तरुण उमेदवार सर्वाधिक असल्याचे दिसत आहे. त्यांनी प्रस्थापित उमेदवारांच्या विरोधात दंड थोपटले आहे.

RELATED ARTICLES

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

आंबेगाव तालुक्यातील अवसरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) अवसरी आयेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या जवसरी खुर्द, अवसरी बुद्दक, गावडेवाडी या परिसरात पाऊस झाला. अवसरी खुर्द येथे साडेतीन...

Recent Comments