Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजअजित पवार गुरुवारी बारामती तालुका काढणार पिंजून

अजित पवार गुरुवारी बारामती तालुका काढणार पिंजून

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

बारामती – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत निवडणूकमय वातावरण झालेले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीत मेंळावे व भेटीगाठींचा धडाका लावलेला असून दुसरीकडे आता मुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील बारामती तालुका पिंजून काढण्याचा निर्णय घेतला आहे.

गुरुवारी (ता. 14) अजित पवार बारामती तालुक्यामध्ये एकाच दिवशी सात सभा घेणार आहेत. बारामती तालुक्यातील सर्व गावातील कार्यकर्त्यांना या सात सभांना वेगवेगळ्या ठिकाणी आमंत्रित करण्यात आले असून कार्यकर्त्यांनी या सभांना उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

एकीकडे स्वतः ज्येष्ठ नेते शरद पवार हे सुप्रिया सुळे यांच्यासाठी मैदानात उतरलेले असल्याने अजित पवार यांनी देखील आता बारामतीवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.

बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार हे आता जवळपास निश्चित झाले असल्यामुळे दोन्ही गटाकडून शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे.

गुरुवारी अजित पवार सुपे, कोन्हाळे बुद्रुक, झारगडवाडी, करंजेपुल, माळेगाव बुद्रुक, नीरा वागज व बारामती शहरातील मुक्ताई लॉन्स या ठिकाणी सभा घेऊन आपली भूमिका कार्यकर्त्यांसमोर मांडणार आहेत.

अजित पवार यांनी भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जात सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली. बारामतीत आता सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना पाहायला मिळणार आहे.

अजित पवार यांच्या सभेच्या पत्रकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व खासदार रामदास आठवले यांचे व संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार यांचे फोटो प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या पत्रकावर बारामती तालुका महायुती मित्रपक्ष यांचाही उल्लेख आवर्जून करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments