Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज अजित पवारांच्या टीकेचा वार अन् अमोल कोल्हेंनी काढली बचावासाठी ढाल, म्हणाले...

अजित पवारांच्या टीकेचा वार अन् अमोल कोल्हेंनी काढली बचावासाठी ढाल, म्हणाले…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे – परिस्थिती बदलली म्हणून खोटे बोलणे माझ्या तत्वात बसत नाही. अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांनी माझ्या विजयासाठी मेहनत घेतली हे खरेच आहे. अजितदादा मोठे नेते आहेत. इतक्या मोठ्या नेत्याविषयी बोलायला मी फार लहान कार्यकर्ता आहे. ना मी राजकारणातला आहे, ना माझी राजकीय पार्श्वभूमी आहे. ना माझा कारखाना आहे, ना कुठली शिक्षणसंस्था आहे. त्यामुळे अशा मोठ्या नेत्यांनी बोलणे आणि त्यावर मी माझी प्रतिक्रिया देणे हे बातम्यांमध्ये येण्यासाठी मला पटत नाही. मला जी जबाबदारी दिलीय ती पार पाडणे महत्त्वाचे आहे. यापुढे शरद पवारांच्या नेतृत्वात शिरूर मतदारसंघाचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते मार्गी लावणे गरजेचे आहे. त्यामुळे दादांबद्दल माझ्यासारख्या कार्यकर्त्याने प्रतिक्रिया द्यावी हे पटत नाही असं विधान खासदार अमोल कोल्हे यांनी केले आहे.

अजित पवारांच्या टीकेवर अमोल कोल्हे यांनी हा बचावात्मक पवित्रा घेतला आहे. पुण्यात अजित पवारांनी माध्यमांशी बोलता कोल्हेंवर टीका केली होती. त्यावर अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, अजितदादांनी अनेक ठिकाणी भाषणात माझे कौतुक केले आहे. कदाचित त्यांना कुणी माहिती दिली असेल ती चुकीची असेल. त्यामुळे गैरसमजातून त्यांनी टीका केली असेल. मी मतदारसंघात काम केले नसते तर कोविडच्या काळात देशात ५ लाख इतके लसीकरण करणारा देशातील एकमेव मतदारसंघ आहे. इंद्रायणी मेडिसिटीसारखा प्रोजेक्ट शिरूर मतदारसंघात मांडला. शिवसंकल्प सृष्टी प्रस्तावित आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचा जिर्णोद्धाराला चालना मिळाली. ही चालना मिळण्यासाठी कोण कोण कारणीभूत आहे हे समोर ठेवावे. राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पातून आज ३० हजार कोटी प्रकल्प मतदारसंघात येतायेत. जर काहीच कामे मतदारसंघात झाली नसती तर हे काही झालेच नसते असं प्रत्युत्तर कोल्हेंनी दिले आहे.

तसेच निवडणूक हे केवळ माध्यम असते. आज राजकारणाकडे पाहताना साधन म्हणून पाहिले जाते. निवडणूक हे माध्यम आणि सत्ता हे साधन आहे. सत्ता येते, जाते, पदे येतात जातात आपण काम करणे महत्त्वाचे आहे. आपली तत्वे, मूल्ये, निष्ठा या सगळ्या गोष्टी एका जागी ठेऊन हे काम करणे मला गरजेचे वाटते. त्यानुसार शरद पवारांच्या मार्गदर्शनात मी काम करतोय. अजितदादा फार मोठे नेते आहेत. त्यांच्याबद्दल कुठलेही विधान करणे मला शोभणार नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल काही तर्क लावणे मला उचित वाटत नाही असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, विश्वासानं ज्या गोष्टी खासगीत सांगण्यासारख्या असतात त्या खासगी ठेवण्याचा संकेत असतो. मला वाटते की, हा संकेत माझ्याकडून किमान पाळला जावा, कारण आमच्यात जे काही बोलणे खासगीत झाले असेल ते मला चारचौघात बोलणे योग्य वाटत नाही. मग चारचौघात सांगायचे झाले तर सर्वच सांगावे लागते फक्त निवडक सांगता येत नाही. खासगीतील गोष्टी मला सांगता येणार नाहीत. अजितदादा पालकमंत्री आहेत, त्यांच्याशी अनेकदा चर्चा होते. त्यामुळे काही दुरावा होईल असं वाटत नाही. राजकारणात अशी विधाने येत असतात. याआधी दादांनी माझ्याबद्दल, कामाबद्दल जे काही बोललेत ते त्याची भाषणे आहेत. कौतुकाची थाप अनेकदा दिलीय. आता ते काही वेगळे बोलत असतील तर मी का रागवावे? अजितदादांनी एक विरोधात वेगळे दिले म्हणून मी त्यांच्याविषयी का बोलावे, रागवावे? अशी सावध भूमिका अमोल कोल्हे यांनी घेतली आहे.

 

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments