Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजअजित पवारांचा पुन्हा अमोल कोल्हेंवर हल्लाबोलः म्हणाले, काही लोक बोलघेवडे, तीन...

अजित पवारांचा पुन्हा अमोल कोल्हेंवर हल्लाबोलः म्हणाले, काही लोक बोलघेवडे, तीन पक्ष फिरुन आलेल्यांनी स्वाभिमानाच्या गप्पा मारु नयेत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

शिरुर लोकसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे संभाव्य उमेदवार अमोल कोल्हे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सध्या चांगलेच शाब्दिक युद्ध रंगले आहे. कोणताच पर्याय नसतो तेव्हा आम्ही कलाकाराला निवडणुकीला उभं करतो, अशा शब्दांत अजित पवार यांनी कोल्हेंची सकाळी खिल्ली उडवली होती.

त्यावर अमोल कोल्हे यांनीही माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पक्षात घेण्यासाठी अजितदादा 10-10 वेळा कशासाठी निरोप पाठवत आहेत, असा सवाल विचारला होता. यानंतर पुन्हा अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्या टीकेची झोड उठवली. सोमवारी पिंपरी-चिंचवड येथे वज्रमूठ सभेत बोलत होते.

बोलघेवडे स्वाभिमानाच्या बढाया मारतात

यावेळी अजित पवार यांनी आक्रमक शैलीत अमोल कोल्हेंचा समाचार घेतला. त्यांनी म्हटले की, काही लोक बोलघेवडे आहेत. ते काय बोलतात, याकडे लक्ष देऊ नका. विकासाची वज्रमूठ पाहा आणि ते लक्षात घ्या. काहींनी मंचरमध्ये सभा घेऊन स्वाभिमानाच्या बढाया मारल्या. पण जे लोक तीन पक्ष फिरून आले आहेत त्यांनी स्वाभिमानाच्या गप्पा मारु नयेत, असा टोला अजित पवारांनी लगावला.

कुकडी प्रकल्पास वळसे पाटलांचे प्रयत्न

कुकडी प्रकल्पाचे श्रेय शरद पवारांना दिलं जात असताना अजित पवारांनी शेतकरी मेळाव्यातुन कुकडी प्रकल्प हा दिलीप वळसे पाटीलांचे वडील दत्तात्रय वळसे पाटील यांनी 1968 साली याची संकल्पना मांडल्याचे अजित पवारांनी सांगितले. तसेच अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याच्या निर्णयाचेही समर्थन केले. आम्ही बेरजेचे राजकारण करत आहोत. पण यात आम्ही आमची विचारधारा सोडलेली नाही, असे अजित पवार यांनी म्हटले.

शिरूर लोकसभा राष्ट्रवादीला मिळणार

शिरूर लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे येण्याची दाट शक्यता आहे. इथं महायुती म्हणून आपण उमेदवार देणार आहोत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना करायचं आहे. यात आपण मागे राहायचे नाही. तुम्ही म्हणाल आमचे प्रश्न? आम्ही शेतकरी आहोच. तुम्ही अर्ध्या रात्री फोन करा, पडेल ती किंमत मोजू पण तुम्हा शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे अजित पवार यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments