Tuesday, July 15, 2025
Homeक्राईम न्यूजअचानक लावला ब्रेक अन् लोखंडी सळ्या थेट घुसल्या अंगात; ट्रक चालकाचा दुर्दैवी...

अचानक लावला ब्रेक अन् लोखंडी सळ्या थेट घुसल्या अंगात; ट्रक चालकाचा दुर्दैवी मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः पुण्याच्या चांदणी चौकात गुरुवारी रात्री झालेल्या एका भीषण अपघातानंतर पुन्हा एकदा या परिसरातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एका ट्रक चालकाला अचानक ब्रेक लावणे जीवावर बेतले आणि लोखंडी सळई अंगात घुसल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

पुण्यातील चांदणी चौक, जो सततच्या वाहतूक कोंडीसाठी ओळखला जातो, दरम्यान, एका मालवाहू ट्रकच्या चालकाने समोर अचानक आलेल्या वाहनाला वाचवण्यासाठी तातडीने ब्रेक दाबले या घटनेत, ट्रकच्या ट्रॉलीमध्ये भरलेल्या लोखंडी सळ्या केबिनमध्ये घुसल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून बंगळुरूकडे लोखंडी सळई घेऊन निघालेला हा ट्रक चांदणी चौकातून जात असताना अचानक त्याच्या समोर एक वाहन आले. संभाव्य अपघात टाळण्यासाठी चालकाने प्रसंगावधान राखत ब्रेक लावले. मात्र, वेगाने पुढे सरकलेल्या लोखंडी सळ्या ट्रकच्या केबिनचा पुढचा भाग भेदून थेट चालकाच्या शरीरात घुसल्या. हा अपघात इतका भीषण होता की, केबिनचा अक्षरशः चुरा झाला होता आणि चालकाचा जागीच मृत्यू झाला होता.

चालक हा मूळचा राजस्थानचा असल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. चालकाचा मृतदेह ससून रुग्णालयात पाठवण्यात आला. या अपघातामुळे काही काळ चांदणी चौकातील वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, पोलिस सध्या या घटनेचा अधिक तपास करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments