Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज अखेर महापालिकेने भिडे वाड्याचा ताबा घेतला, कडेकोट बंदोबस्तात कारवाई; १३ वर्षाच्या न्यायालयीन...

अखेर महापालिकेने भिडे वाड्याचा ताबा घेतला, कडेकोट बंदोबस्तात कारवाई; १३ वर्षाच्या न्यायालयीन लढ्यानंतर यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : अज्ञानरूपी अंधार दूर करण्यासाठी महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी बुधवार पेठेतील भिडे वाड्यात देशातील पहिली मुलींची शाळा सुरु केली होती. हाच भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक व्हावा यासाठी लढा दिला जात होता. तब्बल १३ वर्षाच्या न्यायालयीन लढ्यानंतर हा मार्ग सुकर झाला आणि सोमवारी (दि. ४) रात्री मोठ्या पोलिस बंदोबस्तात भिडेवाड्याचा ताबा महापालिकेने घेतला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुणे महापालिकेने भिडे वाड्याचे जागा मालक आणि भाडेकरूना नोटीस देऊन पंचनामा केला. सोमवारी रात्री उशिरा महापालिकेने कडेकोट पोलीस बंदोबस्तात या वाड्यातील जागेचा प्रत्यक्ष ताबा घेतला. या जागेचे भूसंपादन करण्यात महापालिकेला अखेर यश आले आहे.

फुले दाम्पत्यांच्या कार्याला खऱ्या अर्थाने अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या आठवणी जपण्यासाठी म्हणून भिडेवाडा हा राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. गेली १३ वर्ष न्यायालयीन लढा सुरू होता. भिडे वाड्याची जागा एका महिन्यात म्हणजे ३ डिसेंबरपर्यंत महापालिकेच्या ताब्यात द्यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने जागा मालक आणि भाडेकरूंना दिले होते. त्यानुसार पुणे महापालिकेच्या भूसंपादन विभागाने सोमवारी दुपारी भिडेवाडा येथे जाऊन जागा मालक आणि भाडेकरू यांना नोटीसा देऊन पंचनामा केला. पण तेथील बहुतांश ठिकाणचे दुकाने बंद होते. त्यामुळे नोटीस देता आली नाही. त्यानुसार प्रशासनाने पंचनामा करून घेतला आहे.

पुणे महापालिकेने भिडे वाड्याचा प्रत्यक्ष ताबा घेण्याची कारवाई सोमवारी रात्री उशिरा सुरू केली. या कारवाईसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. या कारवाईत महापालिकेने क्रेन, तीन जेसीपी, सहा ट्रक आणि कर्मचारी तैनात ठेवले होते.

पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, भूसंपादनच्या उपायुक्त प्रतिभा पाटील, पोलीस उपायुक्त संदीपसिंह गील यांच्यासह अधिकारी वर्ग आणि महापालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी बघ्याचीही मोठी गर्दी झाली होती.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुणे महापालिकेने पोलिस बंदोबस्तात सोमवारी भिडे वाड्याचा प्रत्यक्ष ताबा घेतला आहे.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments