इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली. या हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड वाल्मीक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला होता. अखेर आज धनंजय मुंडे यांनी स्वतः न येता आपल्या पीए द्वारे मुख्यमंत्र्यांच्या सागर बंगल्यावर आपला राजीनामा सुपूर्द केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर धनंजय मुंडे यांचे पीए प्रशांत जोशी यांनी जाऊन मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला आहे. थोड्याच वेळात मुख्यमंत्री विधान भवनात राजीनाम्याची घोषणा करतील. दरम्यान विविध भ्रष्टाचार प्रकरणात आरोप झालेले धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी आपल्यावरील आरोपबाबत स्पष्टीकरण ही दिलं होतं. विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुंडे राजीनामा देतील असा दावा पत्नी करुणा मुंडे यांनी केला होता. त्यानंतर करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांनीं राजीनामा दिला असून तो दोन-तीन दिवसात जाहीर केला जाईल असा नवा दावा केला होता. अखेर आज मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला आहे.
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर राज्यभरात आरोपी विरोधात संतापाची लाट उसळली आहे. या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धनंजय मुंडे यांच्या राजीनामाच्या मागणीने जोर धरला होता. आज अधिवेशनाच्या दुसरा दिवस सुरू होण्याआधीच धनंजय मुंडे यांनी अखेर आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांच्याकडे सोपवला आहे.