Thursday, November 30, 2023
Home क्राईम न्यूज अखेर 'त्या' माथेफिरूला अटक, AC Local वर दगड मारून केली होती नासधूस,...

अखेर ‘त्या’ माथेफिरूला अटक, AC Local वर दगड मारून केली होती नासधूस, एक जखमी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

डोंबिवली | 10 नोव्हेंबर 2023 : घामाच्या धारा वाहणाऱ्या मुंबईकरांना एसी लोकल सुरू झाल्यापासून जरा गारवा मिळू लागला. गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील एसी लोकलची संख्याही वाढवण्यात आली होती. गारेगार प्रवासामुळे प्रवासीही सुखावले होते. मात्र याला अचानकच गालबोट लागलं ते एसी लोकलवर झालेल्या दगडफेकीमुळे गुरूवारी सकाळच्या सुमारास मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर धावणाऱ्या एसी लोकलवर ठाकुर्ली ते डोंबिवली स्थानकादरम्यान दगडफेक करण्यात आली.

दगड लागून एसी लोकलच्या काचेचे तर नुकसान झालेच. एसी लोकल धावत असताना अचानक जोरात दगड बसल्याने खिडकीच्या काचेला मोठा तडा गेला. पण या घटनेत एक महिलादेखील जखमी झाली. याप्रकरणी अखेर एका माथेफिरुला अटक करण्यात आली आहे. शरद गांगुर्डे असे या माथेफिरू तरुणाचे नाव आहे तो मूळचा चाळीसगाव येथे राहणारा आहे. पोलिस त्याची कसून चौकशी करत असून त्यानंतरच दगडफेकीचे कारण स्पष्ट होऊ शकेल.

वेगात जात होती लोकल आणि अचानक दगड भिरकावला….

नेहमीप्रमाणे गुरूवारी सकाळी टिटवाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत एसी लोकल सुरू झाली. सकाळी नऊच्या सुमारास ठाकुर्ली ते डोंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान लोकल आली असतानाच ठाकुर्लीजवळ बाजूच्या वस्तीमधून एक दगड एसी लोकलच्या खिडकीवर फेकण्यात आला. वेगात भिरकावल्याने दगड काच फोडून खिडकीजवळ बसलेल्या एका महिलेला लागला. त्यामध्ये ती किरकोळ जखमी झाली, पण अचानक दगड आल्याने तिला धक्का बसला.

या घटनेमुळे लोकलमधील प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. काहींनी याप्रकरणाची माहिती तातडीने रेल्वे प्रशासनाला ट्वीटरच्या माध्यमातून दिली. ही माहिती डोंबिवली लोहमार्ग, रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनाही मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने ठाकुर्ली रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासले. यावेळी काही गर्दुल्ले ठाकुर्ली जवळील वस्तीत रेल्वे मार्गालगत बसून दगडफेक करत असल्याचे आढळले. पोलिसांनी त्यांचा ठाकुर्ली रेल्वे स्थानक परिसरात शोध घेऊन त्यातील एकाला तत्काळ अटक केली. शरद गांगुर्डे असे या माथेफिरू तरुणाचे नाव आहे तो मूळचा चाळीसगाव येथे राहणार आहे. त्याने दगडफेक का केली हे चौकशीअंती स्पष्ट होणार आहे.

दरम्यान मध्य रेल्वेने अलीकडेच, म्हणजे 6 नोव्हेंबर पासून मुख्य मार्गावर 10 एसी लोकल वाढविल्या आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेच्या एकूण एसी लोकलची संख्या आता 56 वरुन 66 इतकी झाली आहे.

RELATED ARTICLES

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

आंबेगाव तालुक्यातील अवसरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) अवसरी आयेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या जवसरी खुर्द, अवसरी बुद्दक, गावडेवाडी या परिसरात पाऊस झाला. अवसरी खुर्द येथे साडेतीन...

Recent Comments