Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजअंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल साडेतीन कोटीचे मेफेड्रॉन (एम.डी.) ड्रग्ज हस्तगत केले आहे. त्यांच्या परदेशी साथीदारांच्या मागावर गुन्हे शाखेची सहा पथके रवाना झाली आहेत.

ही कारवाई गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने केली. अमंली पदार्थ तस्कर ललित पाटील याच्यानंतर करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. वैभव उर्फ पिंट्या भारत माने (रा. पुणे), अजय अमरनाथ करोसिया (३५, रा. पुणे) आणि हैदर शेख (रा. विश्रांतवाडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

यासंदर्भात माहिती देताना अशा अंमली पदार्थांच्या रॅकेटची पाळेमुळे खोदुन काढणार असल्याचा इशारात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला. यावेळी सह पोलीस आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, उपायुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सहायक आयुक्त (गुन्हे) सुनिल तांबे आणि सतिश गोवेकर उपस्थित होते. अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनूसार गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकातील पोलीस अंमलदार विठ्ठल साळुंखे यांना सोमवार पेठेत एका इर्टिगा गाडीमध्ये सराईत गुन्हेगार वैभव हा गाडीचालकासह मेफेड्रॉन ड्रगची डिलिव्हरी देण्यासाठी आल्याची खबर मिळाली होती. त्यानूसार पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे एक कोटीचे मेफेड्रोन (५०० ग्रॅम) सापडले.

वैभव आणि गाडीचा चालक अजय या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. त्यांना पोलीस खाक्या दाखल्यावर त्यांनी मेफेड्रोन देणाऱ्या हैदर शेखची माहिती दिली. त्याच्या मागावर पाच पथके रवाना करण्यात आली. हैदर शेखच्या ताब्यात एक कोटीचे (500 ग्रॅम) मेफेड्रोन आढळून आले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता, त्याच्या मिठाच्या गोडाऊनमध्ये आणखी दिड कोटीचे (७५० ग्रॅम) मेफेड्रोन सापडले. हे गोडावून मिठाचे असून, त्यातील पोत्यांमध्ये मेफेड्रोन आहे का? याची खात्री केली जात आहे.

यातील एकाही आरोपीवर अगोदर अंमली पदार्थ विक्रीचा कोणताही गुन्हा दाखल नाही. वैभववर तब्बल ३६ गुन्हे दाखल आहेत. तो २०१६ मध्ये शेवटचा समर्थ पोलीस ठाण्याच्या गुन्हयात अटक होता. त्याची हैदर शेख बरोबर येरवडा कारागृहात ओळख झाली होती. हैदर हा खूनाच्या गुन्हयासंदर्भात शिक्षा भोगत होता. दोघेही २०२३ मध्ये कारागृहातून बाहेर आहे. तेव्हा पासून ते अंमली पदार्थाच्या व्यवसायात सक्रीय असल्याचे समजते. दरम्यान दोघांनी हे अमंली पदार्थ सॅम आणि ब्राऊन नावाच्या परदेशी नागरिकांना मुंबईला डिलिव्हरी देणार असल्याचे सांगितले आहे. त्यानूसार परदेशी नागरिकांचा शोध घेतला जात आहे.

युनिट एकला लाखाचे रिवॉर्ड

अंमली पदार्थ प्रकरणात चांगली कारवाई केल्याने पोलीस आयुक्त अमितेष कुमार यांनी गुन्हे शाखा युनिट एकला एक लाखाचे रिवॉर्ड जाहीर केले. तसेच सर्व पथकाचा पोलीस आयुक्तालयात सत्कार करण्यात आला.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments