Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजअंगावर भिंत कोसळून मजुराचा दुर्देवीरित्या मृत्यूः सदर प्रकरणी अभियंत्यासह ठेकेदाराविरुद्ध गुन्हा...

अंगावर भिंत कोसळून मजुराचा दुर्देवीरित्या मृत्यूः सदर प्रकरणी अभियंत्यासह ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे शहरातील हडपसर परिसरातील एसपी इन्फोसिटीच्या आवारातील एका कार्यालयात बांधकाम सुरू असताना, प्रसाधनगृहातील भिंत अंगावर कोसळून बांधकाम मजुराचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी अभियंत्यासह बांधकाम ठेकेदाराविरुद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  1. संग्राम बालाजी पांडे (वय ३१, रा. खुपटवाडी, उंड्री चौक, पुणे) असे मयत झालेल्या बांधकाम मजुराचे नाव आहे. या दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी अभियंता साहिल निसार कारभारी (वय २९, रा. गुलमोहोर होरायजन, कोंढवा, पुणे), ठेकेदार माधव गोविंदराव माने (रा. पारगेनगर, कोंढवा, पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत किसन तुकाराम माने (वय ३७, रा. पारगेनगर, कोंढवा, पुणे) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दिली आहे.

हडपसर परिसरात फुरसुंगी मध्ये एसपी इन्फोसिटी ही माहिती-तंत्रज्ञान कंपनी आहे. या कंपनीच्या आवारात एका नवीन कार्यालयाचे बांधकाम काम करण्यात येत होते. प्रसाधनगृहाचे नुतनीकरणाचे काम सुरू असताना अचानक भिंत काम करत असलेला बांधकाम मजूर संग्राम पांडे याच्या अंगावर पडली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या संग्रामचा उपचारादरम्यान दुर्देवी मृत्यू झाला. प्रसाधनगृहाचे नुतनीकरणाचे काम सुरू असताना योग्य ती खबरदारी न घेता सुरक्षाविषयक उपाययोजना न केल्याने दुर्घटना घडल्याचे तक्रारदार किसन माने यांनी तक्रारीत सांगितले आहे. पोलीस उपनिरीक्षक एस पवार पुढील तपास करत आहेत.

जेष्ठ महिलेचे मोफत धान्यवाटपाच्या आमिषाने दागिने चोरले

मोफत धान्यवाटप करण्याच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेकडील ६५ हजार रुपयांचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना सिंहगड रस्ता परिसरात घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सिंहगड रस्त्यावरील संतोष हॉल परिसरात ज्येष्ठ महिला फळे, फुले विक्री करतात. त्याठिकाणी दोन चोरटे आले होते, चोरट्यांनी त्यांच्याकडून फळे खरेदी केली. त्यानंतर या भागातील एका बंगल्यात गरजूंना मोफत धान्यवाटप करण्यात येत आहे, असे आमिष चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेला दाखविले. तुमच्याकडील दागिने पिशवीत ठेवा, असे चोरट्यांनी महिलेला सांगितले. चोरट्यांनी महिलेला पाचशे रुपये दिले. केळीच्या पानात पाचशे रुपये आणि केस विंचारण्याची फणी ठेवा, असे सांगून चोरट्यांनी महिलेला बोलण्यात गुंतवले. महिलेने पिशवीत ठेवलेले दागिने, पाचशे रुपये, मोबाइल संच असा ६५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक एन लिटे पुढील तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments